कुरखेडा/गडचिरोली (Kurkheda Police) : सोनसरी येथे शेतशिवारात मोहफूलाची(mohful) अवैध दारुभट्टी सूरू असल्याचा गोपनीय माहीती वरून कूरखेडा पोलीसानी(kurkheda police station)येथे धडक देत १ लाख १५ हजार रू. कीमतीचा दारू व मोहसडवा जप्त केला तसेच आरोपी मोहन दहिकर वय ४४ याचा विरोधात गून्हा दाखल केला. मोहन दहिकर हा गावाजवळच स्वताचा मालकीचा शेतात असलेल्या झोपडीत मोहफूला पासून तयार करण्यात येणारी हात भट्टीची दारू गाळत होता, (Kurkheda Police) पोलीसानी येथे धडक दिली.
यावेळी पूर्वीच कूणकूण लागल्याने तो घटणास्थळावरून पळून गेला. पोलीसानी येथून २५० लिटर गाळलेली दारू, ५ क्विटंल ९० किलो मोहसडवा, गॅस शेगडी, रेगूलेटर,गॅससिलेंडर जप्त केला व आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गून्हा दाखल केला. सदर कार्यवाही ठाणेदार महेन्द्र वाघ, यांचा नेतृत्वात (Kurkheda Police) पोलीस हवालदार शेखलाल मडावी, पोलीस शिपाई प्रदिप भसारकर,पोलीस शिपाई नंदकिशोर मेश्राम यांचा चमूने केली, प्रकरणाचा पूढील तपास हवालदार शेखलाल मडावी करीत आहे.