हरदोली/सि. (Tiger Attack) : तुमसर तालुक्यातील मोहगाव खदान परिसरात जंगलव्याप्त गावात वाघाचा धुमाकूळ असून दहशत कायम आहे. दि.११ मे रोजी गावालगतच्या जंगलात चराईसाठी गेलेल्या किसान पटले नामक शेतकरी पशुपालकाच्या गायीवर (Tiger Attack) वाघाने झडप घालून शिकार केली. सदर घटना आज दुपारी ३.३० वाजतादरम्यान उघडकीस आली.
मोहगाव खदान येथील किसान पटले व इतरही शेतकरी पशुपालकांची पाळीव जनावरे गावालगतच्या पाचरा इंजेरिया वनविभागाच्या जंगल परिसरात गेल्या होत्या. जनावरे चरत असतांना जंगलात दबा धरुन असलेल्या वाघाने गायीवर झडप घालून शिकार केली. या पूर्वी सुद्धा (Tiger Attack) वाघाने हल्ला चढवून अनेक पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे.
ज्या ठिकाणी गायीची शिकार (Tiger Attack) केली, त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाला अग्नि देऊन जाळलेले होते. या घटनेमुळे पशुपालक शेतकर्यांसह नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण होऊन पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त पशुपालाकाला वनविभागाने आर्थिक मदत देऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.