हिंगोली (Land Survey Day) : दिनांक 10 एप्रिल रोजी भूमापन दिनानिमीत्य जिल्हा अधीक्षक भूमी अभीलेख हिंगोली कार्यालयात भूमापन दिन आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात भूमी अभिलेख विभागातील (Land Survey Day) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी यांचा गौरव व सत्कार मा. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हिंगोली मा. प्रशांत बिलोलीकर यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील श्री.टी. जी. सय्यद उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शिरस्तेदार यांचा सदर कार्यक्रमास जिल्यातील संग्रहण मुख्यालय उप अधिक्षक भूमी कार्यालयातील हिगोली, कळमनुरी, औंढा ना, वसमत सहाय्यक, शिरस्तेदार, निमतानदार, भूमापक व इतर कर्मचारी हजर होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभीलेख हिंगोली कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी पिरीश्रम घेतले