अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त!
परभणी (Lightning) : परभणीतील जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा येथे विजेच्या कळकळाटासह ढगफूटी सदृश पाऊस झाला. या पाऊसात विजेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने एका 47 वर्षीय शेतकर्याच्या अंगावर विज कोसळून शेतकरी ठार झाल्याची घटना शनिवार दि 14 जून रोजी दुपारी 1:45 च्या सुमारास घडली. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा-बेलखेडा शिवारात शनिवार दि 14 रोजी दुपारी पावनेदोन च्या सुमारास विजेच्या कळकळाटासह ढगफूटी (Cloudburst) सदृश पाऊस झाला. दरम्यान, शेतात काही कामानिमित्त असलेले, शेतकरी माणिक मिरासे वय 47 वर्ष हे पावसाचा अंदाज पाहून गावाकडे येत असतांना, वाटेतच त्यांच्या आंगावर विज कोसळून ते जागीच ठार झाले. दरम्यान, सरपंच शिवाजी चापके (Sarpanch Shivaji Chapke) यांनी सदर घटनेसंदर्भात माहिती तहसील कार्यालयास (Tehsil Office) कळविली असून, सदर शेतकर्यास गावकर्यांनी जिंतुर येथील रूग्णालयात (Jintur Hospital) हलविले परंतु, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) शेतकऱ्याचे शवविच्छेदन करण्यात आले असुन, सदर शेतकऱ्याला दोन एकर शेती आहे. मयत शेतकर्याच्या (Farmer) पाश्यात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.