Wardha :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (elections)सर्वांनाच प्रतीक् लागलेली आहे. अलीकडेच प्रभाग रचना करण्यात आल्या. तसेच आरक्षण देखील जाहीर होऊ लागले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम
आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुनावणी झाली. राज्यातील महानगरपालिका (Metropolitan Municipality), नगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेला आता अवकाश मिळालेला आहे.
त्यामुळे या निवडणुकीकरिता आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.