कारंजा (Washim):- मागील काही दिवसांपासून कारंजा तालुक्यात अपघाताच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली असताना 12 मे च्या सकाळी साडे 10 वाजतापासून ते 13 मे च्या सकाळी साडे 7 वाजेपर्यंतच्या 24 तासात कारंजा तालुक्यात पुन्हा अपघाताच्या तीन घटना घडल्या.
वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज
यात 5 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा वाढते अपघात (accident)रोखण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. रविवारी 12 मे रोजी सकाळी साडे 10 वाजता कारंजा तालुक्यातील मोखड पिंपरी बस स्टॅन्ड वर दुचाकीची समोरासमोर धडक (strike)झाल्याने अरबाज खान इस्लाम खान वय 25 वर्ष रा. मोखड पिंपरी व रिजवान अली सादिक वय 23 वर्ष रा.कामरगाव हे दोघेजण गंभीर जखमी (seriously injured)झाले. अपघाताची दुसरी घटना कारंजा मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान जवळ घडली. कारंजा मूर्तिजापूर या रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या एका बाजूचे खोदकाम करण्यात आले.
अपघाताच्या प्रमाणात होत असलेली वाढ ही चिंतनीय
त्या खोदकामात दुचाकी चालक दुचाकी घेऊन पडल्याने नेर तालुक्यातील मंगलादेवी येथील रहिवासी अवधूत तुकाराम गोरले वय 40 वर्ष हे गंभीर जखमी झाले. तर अपघाताची तिसरी घटना कारंजा शेलुबाजार मार्गावर सोमवारी 13 मे रोजी सकाळी साडे 7 वाजता घडली .या घटनेत भरधाव बोलेरो पिकप(seriously injured) रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्यामुळे खुसरो पठाण जब्बार पठाण वय 20 वर्ष व मिर्झा अब्दुल रहमान बेग वय 22 वर्ष दोघेही रा. जिंतूर ता. परभणी(Parbhani) हे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या घटनानंतर रुग्णवाहिकेच्या (ambulance)सहाय्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात होत असलेली वाढ ही चिंतनीय असून, यावर प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.




