मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

CM Assistance Cell: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

CM Assistance Cell

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार

मुंबई (CM Assistance Cell) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या प्रकल्पाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष (CM Assistance Cell) बीपीसीएल फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय राखला जाईल आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळणार आहे  तसेच, प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्यांना सर्व संबंधितांनी मान्यता दिली असून, अंतिम सामंजस्य कराराध्ये ठरविण्यात येणाऱ्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली आहे.

लवकर निदान, परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक

या सामंजस्य करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, मुलांचे संरक्षण हे राज्याचे कर्तव्य आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी लवकर निदान , परवडणारे उपचार आणि जागरूकता आवश्यक आहे. शासन आणि समाज दोघांनी मिळून हे काम करणे गरजेचे आहे. टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांनी बालक कर्करोग रुग्णांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्चाची मागणी केली होती. यासाठी विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये बीपीसीएल फाऊंडेशने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपला सहभाग  नोंदवला आहे. त्यानुसार बीपीसीएल फाऊंडेशन टाटा मेमोरियल सेंटरमध्ये  कर्करोगाचे  उपचार घेणाऱ्या बालक रुग्णांच्या सहाय्यासाठी योगदान देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत बीपीसीएल फाऊंडेशन यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीपीसीएल फाऊंडेशनकडून विशेष निधी सामाजिक दायित्वमध्ये देणार आहे. अशा या सामंजस्य करारामुळे बालकांच्या कर्करोग उपचारांतील आर्थिक अडथळे कमी होतात. गुणवत्तापूर्ण उपचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुले हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांना कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने प्रेरित होउन (CM Assistance Cell) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी महत्वाचे योगदान दिले असून मुख्यतः गरीब व गरजू नागरिकांना, विशेषतः रुग्णांना, तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे आणि संपूर्ण प्रणाली कार्यक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती कक्षामार्फत देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026