मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राजकारण तापले; मुख्यमंत्री फडणवीस संतप्त, अधिकाऱ्यांना कडक इशारा

CM Devendra Fadnavis: नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू. खड्ड्यांमुळे अपघातांत पाच जणांचा मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राजकारण तापले; मुख्यमंत्री फडणवीस संतप्त, अधिकाऱ्यांना कडक इशारा

CM Devendra Fadnavis

 

आपली जबाबदारी ओळखा...आरामशीर राहून चालणार नाही: CM देवेंद्र फडणवीस

नाशिक/ मुंबई (CM Devendra Fadnavis) : नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाल्याने हा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. दरम्यान, खड्डे बुजवल्यानंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना फटकारले आहे. "प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. केवळ कार्यालयात बसून चालणार नाही, प्रत्यक्ष कामाची पाहणी करा आणि नागरिकांशी संवाद वाढवा," असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच, खड्डे बुजवण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा, त्यांची पुढील कामे थांबवा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील एका महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेणार असून, त्यावेळी प्रत्यक्ष आणि गुणात्मक सुधारणा दिसली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी महाकुंभ लक्षात घेता अधिक गांभीर्याने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भुजबळ-महाजन वाद पुन्हा चर्चेत

नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत, "असं वाईट नाशिक यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं," अशी टीका केली होती. त्यानंतर शहरात "छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा" अशा आशयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आल्याचे सांगितले जात असून, यामुळे पालकमंत्रीपदाच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे.

महाजनांची सावध भूमिका

सध्या नाशिकची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी या बॅनरबाजीवर सावध प्रतिक्रिया देत, "भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या समर्थकांच्या भावना मी समजू शकतो. मात्र, पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांकडे आहे," असे स्पष्ट केले.

नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आता प्रशासनासह राज्यातील राजकारणही चांगलेच तापले असून, नागरिकांच्या दृष्टीने या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: पत्रकारांचे काम हे अनियमित वेळेचे आणि सतत धावपळीचे असते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व उपचार शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल

Sep 04, 2026
लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

लातूर महापालिका सभेविषयी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे; मंजूर विषयांची अंमलबजावणी थांबविण्यासाठी काकडे! 

CM Devendra Fadnavis: लातूर महानगरपालिकेमध्ये 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर लोकप्रतिनिधींना पुरेशी चर्चा व आपली भूमिका मांडण्याची संधी न देताच सर्व विषय मंजूर

Aug 19, 2026
दुष्काळमुक्त  महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवचन

दुष्काळमुक्त  महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवचन

CM Devendra Fadnavis: देशाच्या विकासाचे 'ग्रोथ इंजिन' असलेल्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Aug 16, 2026
'माझा पुतण्या एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल'; बाळासाहेब फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा विश्वास

'माझा पुतण्या एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल'; बाळासाहेब फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा विश्वास

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित 'देवाभाऊ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी भावनिक आणि उल्लेखनीय वक्तव्य केले.

Aug 03, 2026