इंधन दरवाढीचा फटका! राज्यात आठवड्यातून फक्त ३ दिवस शाळा सुरू ठेवण्याची मागणी

राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होण्याची तयारी सुरू असतानाच स्कूल बस चालक-मालक संघटनांनी मोठी मागणी पुढे आणली आहे.

इंधन दरवाढीचा फटका! राज्यात आठवड्यातून फक्त ३ दिवस शाळा सुरू ठेवण्याची मागणी

School Bus Fare Hike

महाराष्ट्र (School Bus Fare Hike) : राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होण्याची तयारी सुरू असतानाच स्कूल बस चालक-मालक संघटनांनी मोठी मागणी पुढे आणली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे स्कूल बस सेवा चालवणे परवडत नसल्याचे सांगत आठवड्यातून फक्त तीन दिवस प्रत्यक्ष शाळा भरवाव्यात आणि उर्वरित दोन दिवस ऑनलाइन वर्ग घ्यावेत, अशी मागणी स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने राज्य सरकारकडे केली आहे.

संघटनेच्या मते, गेल्या काही दिवसांत इंधन दरांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे स्कूल बस चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सध्याच्या शुल्कामध्ये बस सेवा सुरू ठेवणे अशक्य होत असल्याने सरकारने तातडीने अनुदान, करसवलत किंवा इंधनावर विशेष सवलत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दहा दिवसांत पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ

गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात तब्बल ७ रुपये ३८ पैशांची वाढ झाली असून डिझेल ७ रुपये ०९ पैशांनी महागले आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच वाहतूक खर्च वाढल्याने पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपुरात स्कूल बस भाड्यात १० ते १५ टक्के वाढ

महागाई आणि इंधन दरवाढीचा परिणाम नागपुरातही दिसून येत आहे. नागपूर स्कूल बस व स्कूल व्हॅन संघटनेने बस भाड्यात १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हजार रुपये मासिक भाडे देणाऱ्या पालकांना आता सुमारे १२०० रुपये मोजावे लागू शकतात. तसेच दोन हजार रुपये भाडे असणाऱ्यांना सुमारे २४०० रुपये द्यावे लागू शकतात.

दरवाढीला परिवहन विभागाची मंजुरी आवश्यक असणार असल्याने प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

विदर्भातील उष्णतेमुळे शाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता

दरम्यान, विदर्भातील वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. १० जूननंतरही उष्णतेची लाट कायम राहिली, तर १५ जूनऐवजी राज्यातील शाळा थेट २६ जूनपासून सुरू करण्याचा पर्याय सरकार विचाराधीन ठेवू शकते, असे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभाग याबाबत लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

एका बाजूला इंधन दरवाढ आणि वाढते स्कूल बस शुल्क, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड उष्णता यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार शाळा सुरू करण्याबाबत, बस शुल्कवाढीबाबत आणि ऑनलाइन शिक्षणाबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026