हिंगोली (Manoj Jarange) : मराठा आरक्षण (Maratha Reservation) जनजागृती शांतता रॅलीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे शनिवार दि.६ जुलै रोजी हिंगोलीत येत आहेत. लाखोचा जनसमुदाय रॅलीत सहभागी होत असल्यामुळे रॅली मार्गावर व हिंगोली शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यावर २०० ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातुन रॅलीतील संवाद लोकापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. (Sound projector) साऊंड सिस्टिमच्या कामाला छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. शहरात ध्वज, बॅनर, स्वागत कमान उभारणीला सुरुवात झाली आहे. शांतता रॅली सुरुवात ते समारोप लाखो (Maratha warrior) मराठा महिला व पुरुषांना ऐकण्यासाठी जरांगे पाटील यांचा समारोपी संवाद जनमानसात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, पोस्ट ऑफिस रोड, आखरे मेडिकल, जवाहर रोड, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, इंदिरा गांधी पुतळा परिसर, रामलिला मैदान परिसर, पिपल्स बँक, नांदेड नाका आदी रस्त्यावर शिस्त राहण्यासाठी तब्बल दोनशे (Sound projector) ध्वनिक्षेपक उभारणी करण्यात येत आहे.
पाऊस लक्षात घेऊन सर्व कामाचे काटेकोर नियोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवार दि.२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर (Sound projector) साऊंड सिस्टिमच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी (Maratha warrior) मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. याचबरोबर शहरात ध्वज, पताका, बॅनर, शिवनेरी चौकात भव्य स्वागत कमान आदी कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहेत.