लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी!
मानोरा (Minor Irrigation Department) : तालुक्यातील उमरी खुर्द या गावाचे निवासी शेतकरी यांच्या शेतशिवारा लगत लघुपाट बंधारे विभागाद्वारे बांधण्यात आलेल्या धरणामुळे स्थानिक शेतकऱ्याची शेत जमीन (Farm Land) पाण्यात बुडून राहत असल्याने शेतकऱ्याच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे विभागाने ही जमीन संपादित करण्याच्या मागणी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता (Executive Engineer) याजकडे पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
जमीन पाणलोट विभागाकडून संपादित करण्यात आली!
मौजे उमरी खुर्द येथील शेतकरी उत्तम रामसिंग पवार या शेतकऱ्याचे (Farmers) फुलऊमरी भाग एक मधील गट नंबर १७१ मध्ये स्वतःच्या मालकी हक्काची १ हेक्टर ४० आर एवढी जमीन आहे. उपरोक्त जमीन फुलउमरी धरणाच्या पाण्यामुळे सन २०२२ पासून आतापर्यंत खरीप रब्बी व उन्हाळी अशात कुठल्याही प्रकारचे पिके घेण्यास अयोग्य असून पडीत राहत आहे. दि. ८ ऑक्टोबर रोजी ०३५ आर जमीन पाणलोट विभागाकडून (Watershed Division) संपादित करण्यात आली असून उर्वरित १ हेक्टर ०५ आर जमीन संपादित करण्यात येणे संदर्भात लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.