आखाडा बाळापूर (Akhara Balapur Bazar Samiti) : येथील बाजार समिती सभापती व उपसभापती निवड 15 सप्टेंबर सोमवारी झाली. बाजार समिती (Akhara Balapur Bazar Samiti) कार्यालयात याबाबत निवड प्रक्रिया कार्यक्रम सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय गुठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता सुरु झाली. यात सभापती पदी सलग दुसऱ्यांदा दत्ता संजय बोंढारे यांची तर उपसभापतीपदी संजय भुरके यांची बिनविरोध निवड झाली.
आखाडा बाळापूर बाजार समिती (Akhara Balapur Bazar Samiti) अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत आ.संतोष बांगर व शिवसेना नेते संजय पाटील बोंढारे नेतृत्वाखालील पॅनलने 18 पैकी 17 जागा एकहाती जिंकून बाजार समिती सत्ता सलग राखली होती. सदर पॅनलच्या विरोधात सगळे पक्षनेते एकत्र आले परंतु त्यांना खातेही खोलता आले नव्हते उलट व्यापारी मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने उलटफेर करत विजय मिळवला होता. 31 ऑगस्ट रोजी निवडणूक निकाल घोषित झाला होता आता 15 सप्टेंबर रोजी नवीन सभापती उपसभापती निवड झाली. निवडीनंतर आ.संतोष बांगर, शिवसेना नेते संजय बोंढारे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे उपस्थितीत नवीन पदाधिकारी व संचालक सत्कार करण्यात आला.
निकालात निर्णायक ठरलेल्या औढां तालुक्यात उपसभापतीपद
बाजार समिती (Akhara Balapur Bazar Samiti) राजकारणावर माजी सभापती संजय बोंढारे यांची पंचवीस वर्षांपासून पकड आहे ते स्वतः बारालर्षे सभापती राहिले तर त्यांचे चिरंजीव दत्ता बोंढारे सातवर्षापासून सभापती आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत आ. संतोष बांगर नेतृत्वाखाली दत्ता बोंढारे व संजय बोंढारे यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. आता पुन्हा सलग दुसऱ्या वेळी दत्ता बोंढारे हे सभापती झाले तर सलग दुसऱ्या वेळी विजयी संजय भुरके यांना संधी देऊन उपसभापती पद औंढा तालुक्यात दिले आहे. मागीलवेळी उपसभापती पद औंढा नागनाथ तालुक्याकडे होते. नुकत्याच पार पडलेल्या (Akhara Balapur Bazar Samiti) निवडणूकीत पिंपळदरी बुथवर एकतर्फी मताधिक्य सदर तालुक्याने दिले आहे विजयात मताधिक्य देत मोठा हातभार लावला आहे.यामुळे सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेले संजय भुरके हे उपसभापती झाले.