भंडारा (OBC federation Akrosh) : राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे तसेच हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबत समाजात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महसूल मंत्री तथा ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितले की (OBC federation Akrosh) ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही. तरीही राज्यातील काही मंत्री या निर्णयामुळे ओबीसींना फटका बसला असल्याचे मत मांडतात, तसेच मनोज जरांगे पाटील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्याचे गौरवाने सांगतात. या विरोधाभासी वक्तव्यांमुळे ओबीसी समाज गोंधळात पडल्याचे व मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे ओबीसी महासंघाचे म्हणणे आहे.
महासंघाने लक्ष वेधले की हैदराबाद गॅझेटियरमध्ये सामूहिक नोंदी आहेत, वैयक्तिक नोंदी नाहीत. अशा परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य होणार नाही. मात्र १७ सप्टेंबरपासून मराठवाड्यातील जालना, नांदेड, बीड, हिंगोली व धाराशिव येथे गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वितरित केल्याच्या बातम्यांची दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात असुरक्षिततेचे वातावरण वाढले असून शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी (OBC federation Akrosh) महासंघाने केली.
यावेळी करण्यात आलेल्या मुख्य मागण्यांमध्ये मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसी संवर्गात सामावून घेऊ नये, चुकीच्या पुराव्याच्या आधारे कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवावे, फक्त प्रतिज्ञापत्राच्या आधारे प्रमाणपत्र देऊ नये, खोट्या नोंदींची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळ समिती नेमावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (OBC federation Akrosh) ओबीसी उमेदवारांसाठी जात पडताळणीसह महसूल कागदपत्र बंधनकारक करावे आणि शासन निर्णयातील ‘गावातील, मुळातील व नातेसंबंधातील व्यक्ती’ या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करावा, या मागण्या मांडल्या आहेत.
याप्रसंगी माजी आ.चरण वाघमारे, माजी खा.सुनील मेंढे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे (OBC federation Akrosh) अध्यक्ष डॉ.बबनराव वायवाडे, राष्ट्रीय ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ. मुकेश पुडके, राजीव वंजारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, आशा नेमा राष्ट्रीय ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष नलीनी कोरडे, विनायक मारवाडे, विजय भुरे, अंबदास माधुरकर, किरण व्यवहारे, पवन वंजारी, व्ही.टी. चौधरी, लक्ष्मण फटींग, सदानंद बुरडे, डॉ.हरिदास हटवार, वैशाली कारडे यांचा उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सोपवले. विनोद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोसे बुज येथील विद्यार्थ्यांची यशाची भरारी.