डोंगरकडा (Shaktipeeth Highway) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, जवळा पांचाळ,भाटेगाव, जामगव्हाण,सुकळी (वीर) येथून शक्तिपीठ महामार्गाचे मोजण्यासाठी आलेले अधिकाऱ्यांचे काम शेतकऱ्याने रोखले. 21 जुलै रोजी थांबवले हा महामार्ग तात्काळ रद्द करण्यात यावा. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द घोषणाबाजी करण्यात आली. (Shaktipeeth Highway) शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा. शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या भागातील सुपीक व बागायती जमिनी बाधित होत आहे.
शेती व शेतकरी उध्वस्त करणारा हा महामार्ग (Shaktipeeth Highway) आम्हाला मान्य नाही. अनेक अल्पभूधारक शेतकरी या मार्गामुळे भूमिहीन होत आहे त्यामुळे याच्या उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण होणार आहे हा महामार्ग पर्यावरण विध्वंसक असल्यामुळे भविष्यात बाधीत गावांनाही अनेक समस्यांना तोंड लागणार आहे बाधीत शेतकऱ्यासोबत ग्रामस्थांचा महामार्गाला विरोध असल्यामुळे महामार्ग कायमचा रद्द करावा, अशी बहुसंख्यांची मागणी आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या इच्छे विरोधात भूसंपादनाची प्रक्रिया जबरदस्तीने लाटण्याचा प्रयत्न करू नये असा प्रयत्न झाल्यास शेतकरी मोजणी करणाऱ्या पथकास आपापल्या शेतात पाऊल ठेवू देणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्यावी आमच्या एक मुखी मागणीची दखल घेत भूसंपादन प्रक्रिया व मोजणी थांबून शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा व आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, अशी निवेदनात म्हटले आहे.
या मोजणीसाठी आखाडा बाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे सुनील रिठे रामदास ग्यादलवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी निवेदन डोंगरकडा येथील मंडळ अधिकारी प्रेमदास चव्हाण यांना देण्यात आले.