खापरी (भुयार) येथील घटना
पवनी (Old man Death) : घराच्या स्लॅबवरून पायर्याने उतरत असताना अचानक पाय घसरल्याने जमिनीवर कोसळली. त्यात तिचा (Old man Death) मृत्यू झाला. सोना रामभाऊ शेनमारे (६५) रा.खापरी (भुयार) असे मतकाचे नाव आहे.
पवनी तालुक्यातील खापरी येथील सोना शेनमारे ही दि.१४ जून रोजी नेहमीप्रमाणे घराच्या बाजुला राहणार्या हिरामण दडमल यांच्या घराच्या स्लॅबवर झोपण्यास गेली होती. सकाळी स्लॅबवरून पायर्याने खाली उतरत असताना (Old man Death) अचानक तिचा पाय स्लीप होऊन जमिनीवर कोसळली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाली. जखमीला उपचाराकरीता प्रा.आ.केंद्र भुयार येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमीला ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथे नेण्यात आले. तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद पवनी पोलिसात केली आहे.




