शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन!
बासंबा (Shiv-Sena) : बासंबा फाटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने 12 जून रोजी शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी व निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने सर्वसामान्यांना केलेला वादा पूर्ण करण्यासाठी बासंबा फाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांबरोबर (Officers) शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांची उपस्थित होती. भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या सरकारने (Govt) निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे (Farmers) पूर्णपणे कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्णपणे सरकार विसरून गेले असून, त्यांना या आश्वासनाची जाणीव करून देण्यासाठी हिंगोली तालुक्यातील बासंबा फाटा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे 12 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तर दुपारी 1 वाजेपर्यंत भव्य रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Aandolan) करण्यात आले.
शिवसेनेचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ यांचे मोठ्या प्रमाणात उपस्थित!
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड व हिंगोली सहसंपर्क प्रमुख बबनराव थोरात माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाप्रमुख अजय अजय सावंत उर्फ गोपू पाटील, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,अँड शिवाजीराव माने, सहसचिव विनायक भिसे पाटील, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे शेतकरी नेते वसीम देशमुख, माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, बाळासाहेब मगर, गणेश शिंदे, विठ्ठलराव चौथमल, आनंदराव जगताप, दिनकरराव देशमुख, भानुदास जाधव, जिल्हा उपसंघटक शंकरराव घुगे, पंढरीनाथ ढाले पाटील, यांच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी (Office Bearer) शेतकरी व ग्रामस्थ (Villagers) यांचे मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसून आली यावेळी.
सत्ताधारी पक्षाने केलेल्या वादा पूर्णपणे फोल ठरला!
सह संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सत्ताधारी पक्षाने केलेल्या वादा पूर्णपणे फोल ठरला असून, यापुढे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी (Farmers Loan Waiver), शेतकऱ्यांना 24 तास वीज, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा, शेतात जाण्यासाठी रस्ते, शेतकऱ्यांना डीएपी खते उपलब्ध करून देणे, हर घर जल व हर घर छत लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये महिना तसेच वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये महिना, फाट्यावरील मंजूर पुलालाचे काम, त्वरित पूर्ण करावे नसता सरकारला रस्त्यावर न फिरू देण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला प्रशासन म्हणून महसूल विभागाला निवेदन देण्यात आले. यासाठी जवळपास दोन तास भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये बळीराम दराडे, एल.जी घुगे, पुंडलिकराव नागरे, पांडुरंग कुरवाडे, महाराज भगवानराव घुगे, शेख रजाक, विठ्ठल माळी, ऋषिकेश शिंदे , देवराव ढाले, रितेश ढाले, लिंबाजी गोरे याचबरोबर अनेक गावातील शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली. यावेळी या रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन शिवसेना उबाठा जिल्हा उप संघटक, शंकर घुगे यांनी केले होते तर आभार प्रदर्शन पंढरीनाथ ढाले पाटील यांनी व्यक्त केले. या आंदोलनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, अंबादास भुसारे बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे, बासंबा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्या बरोबर हिंगोली जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचारी व पोलीस विभागातील अनेक अधिकारी यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक बंद करण्यात आली.