गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल!
परभणी (Parbhani Accident) : परभणीच्या गंगाखेड येथे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी ते लिमला रस्त्यावर भरधाव वेगातील वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाल्याप्रकरणी बुधवार 2 जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालविल्याने वाहनावरील ताबा सुटून अपघात!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी ते लिमला रस्त्यावर 11 जून रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास दगडवाडी येथील पंडीत रुस्तुम मजलवार, वझुर येथील कान्हा ऊर्फ कृष्णा सिताराम पवार हे लिमला येथील त्यांचा मित्र प्रसाद मारुती शिंदे वय 29 वर्ष याच्या ताब्यातील वाहन क्र. एमएच -22-यु- 6080 या वाहनातून दगडवाडी रस्त्याने लिमला येथे जात असतांना हरिचंद मचकराव वाघमारे यांच्या शेताजवळ वाहन चालक प्रसाद मारुती शिंदे यांच्या ताब्यातील वाहनावरचा (Vehicle) ताबा सुटल्याने दोन ते तीन पलट्या मारुन वाहन रस्त्याच्या बाजुला हरिचंद मचकराव वाघमारे यांच्या शेतात पडले. अपघात झाल्याचे पाहुन दगडवाडी येथील ग्रामस्थांनी (Villagers) चालक प्रसाद मारुती शिंदे वय 29 वर्ष रा. लिमला, पंडीत रुस्तुम मजलवार वय 40 वर्ष रा. दगडवाडी व कान्हा ऊर्फ कृष्णा सिताराम पवार रा. वझुर या तिघांना वाहनातून बाहेर काढुन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्रसाद मारुती शिंदे वय 29 वर्षे रा. लिमला ता. पुर्णा यांचा दि. 14 जून रोजी मृत्यु झाल्याचे समजल्याने पंडीत रुस्तुम मजलवार वय 40 वर्षे रा. दगडवाडी ता. पुर्णा यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) दिलेल्या फिर्यादीत वाहन क्र. एमएच -22- यु- 6080 चे चालक प्रसाद मारुती शिंदे रा. लिमला ता. पूर्णा यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालविल्याने वाहनावरील ताबा सुटून अपघात होवुन या अपघाता फिर्यादी व कान्हा ऊर्फ कृष्णा सिताराम पवार रा. वझुर ता. पुर्णा हे जखमी झाले तर चालक प्रसाद मारुती शिंदे हे उपचारादरम्यान, मयत झाल्याचे म्हटल्याने वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि सिद्धार्थ इंगळे, जमादार मुंजा वाघमारे, पो. शि. भरत पवार हे करीत आहे.