७४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव देणार – सभापती साहेबराव भोसले
परभणी/गंगाखेड (Parbhani Cotton price) : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या वतीने सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी पासून हमी भावात कापूस खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले यांनी दिली आहे.
भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या वतीने सोमवार रोजी सुरु करण्यात आलेल्या कापूस खरेदी प्रारंभ पूजन प्रसंगी सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, सचिव राजेभाऊ गायकवाड, संचालक उमाकांत कोल्हे, प्रशांत काबरा, नारायणराव देशमुख, संतोष जाधव, माजी सचिव माणिकराव नरवाडे आदींसह बाजार समितीचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंद करणे महत्त्वाचे असुन नोंदणीसाठी शेतकरी बांधवांनी आधार कार्ड, कापूस पिक पेरा नोंद असलेली सातबारा, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्र सोबत आणून ज्याठिकाणी कापूस विक्री करणार आहात त्या ठिकाणी आपल्या कापसाची ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी सभापती साहेबराव भोसले यांनी केले आहे.
शासकीय हमी भावात सीसीआयच्या वतीने गंगाखेड येथील गोयल जिनिंग फॅक्टरी, विस्तारित नवीन मार्केट यार्ड, प्रसाद जिनिंग परळी रोड या ठिकाणी कापूस खरेदी सुरू केलेली असुन शेतकरी बांधवानी स्वच्छ व आद्रता नसलेला कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन ही (Cotton price) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, सचिव राजेभाऊ गायकवाड यांच्यासह संचालक मंडळांनी केले आहे.