परभणी/झरी (Parbhani) :- येथून समस्त गावकरी मंडळींच्या वतीने तसेच श्री राम मंदिराच्या संयोजनातून भल्या पहाटे श्री क्षेत्र नागझरी येथील पाणी घेऊन श्रीक्षेत्र औंढा नागनाथ दारूका वने क्षेत्र या ठिकाणी कावड यात्रा काढली . प्रथमतः सहभागी कावडी यांचे झरी येथील नागझरी कॉर्नर वर सर्व महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. हि कावड यात्रा श्री क्षेत्र नागझरी (Nagzari) येथून पुढे गावा मध्ये आली असता रांगोळी, काढत फटाक्याच्या अतिष बाजी ने गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले पुढे ही यात्रा झरी येथील श्री राम मंदिर येथे आली असता सद्गुरू रामभरोसे महाराज व काशी येथील पाच नागा साधू यांच्या हस्ते भव्य कावड यात्रेची महाआरती होऊन पुढे मार्गस्थ झाली.
अनवाणी पायाने तसेच भर उन्हात हि कावड संपूर्ण गावातून मिरवणूक
या कावड यात्रेचे विशेष महत्त्व म्हणजे यात्रेतील 52 कावडिया हे जवळपास 250 ते 350 लिटर पाणी घेऊन अनवाणी पायाने तसेच भर उन्हात हि कावड संपूर्ण गावातून मिरवणूक काढली. या कावड यात्रेत बाल गोपाळ तसेच तरुण , महिला जेष्ठ नागरिक सहभागी झाले .पुढे हजारो भक्तांसहित हर्ष उल्हासात मार्गस्थ झाले. त्याच बरोबर दुधगाव फाटा येथे ही यात्रा आली असता जोरदार स्वागत करण्यात आले तसेच तेथे फराळ व नाश्त्याची सोय करण्यात आली. ही कावड यात्रा श्री क्षेत्र नागझरी येथून १० ऑगस्ट रोजी प्रस्थान करून दूधगाव – आसेगाव मार्गे पुढे चिंचोली येथे मुक्काम राहणार आहे व श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथे ११ ऑगस्ट रोजी पोहचेल . या कावड यात्रेचे आयोजन समस्त गावकरी मंडळी तसेच श्री राम मंदिर यांच्या संयोजनातून काढण्यात आली