परभणी (Parbhani Suicide) : शहरातील खानापूर फाटा भागात एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने गळफास (Parbhani Suicide) घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार ८ मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. सतीश सुरेश पुंडगे वय २१ वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
खानापूर फाटा परिसरातील घटना
सदर तरुण हा नांदेड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. काही दिवसापूर्वी तो परभणी येथे घरी आला होता. युवकाचे वडील गृहरक्षक दलात जवान आहेत. ते सध्या लोकसभा निवडणूक बंदोबस्ताच्या निमित्ताने बाहेरगावी गेले आहेत. बुधवारी सकाळी युवकाची आई बाहेर कामाला गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या घरी परत आल्यावर सतीश पुंडगे आत्महत्या केल्याचे दिसून आले. साडीच्या साह्याने घरातील फॅनला युवकाने गळफास (Parbhani Suicide) घेतला.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही
घटनेची माहिती नवामोंढा पोलिसांना (Parbhani Police) देण्यात आली. सपोनि. विकास कोकाटे, पोह आर.एस. मुंढे, पोह भागवत नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. युवकाने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली, याचे कारण समजू शकले नाही. (Parbhani Police) नवामोंढा पोलिस अधिक तपास करत आहेत.