परभणी (Parbhani):- शेतातील नापिकीला कंटाळून मनस्थिती बिघडल्याने एका शेतकर्याने घरातील स्लॅबच्या कडीला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना १७ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे उघडकीस आली. सदर प्रकरणी पिंपळदरी पोलिस ठाण्यात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील घटना; पिंपळदरी पोलिसात नोंद..!
अण्णा पवार यांनी खबर दिली आहे. भागवत उर्फ बबन पवार (वय ३२ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. शेतीच्या नापिकीला कंटाळून मनस्थिती बिघडल्याने भागवत पवार यांनी गळफास घेवून आत्महत्या (suicide) केली. तपास पो.ह. धुळगुंडे करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. शेतातील नापिकी, कर्ज या विवंचनेत शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.