सामान्य प्रवाशांच्या खिशाला लागली कात्री…
गंगाखेड (Parbhani) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टि. बस (ST Bus) प्रवास टिकिटात शुक्रवार 24 जानेवारी रोजीच्या मध्यरात्रीपासून अचानक भरमसाठ वाढ झाल्याने सर्व सामान्य प्रवाशांच्या खिशाला लागली कात्री लागली असुन गंगाखेड ते परभणी प्रवासाठी आता 60 रुपयांऐवजी 71 रुपये भाडे मोजावे लागणार आहे. टिकिटाच्या सुट्टया पैशांमुळे (Vacation Money) वाहकांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढल्याचे पहावयास मिळत आहे.
सुट्टया पैशांमुळे वाहकांची वाढली डोकेदुखी!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टि. बसने परभणी प्रवास करीत असतांना तीन वर्षांपूर्वी 55 रुपयांत प्रवास केला जात होता. मात्र त्याच दरम्यान तीन वर्षांपूर्वी झालेल्या टिकीट दरवाढीमुळे (Ticket Price Hike) सद्यस्थितीत 60 रुपयांत प्रवास सुरु होता. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडे वाढ सूत्रातील डिझेल, चेसीस, टायर व महागाई भत्त्याच्या मुल्यात बदल झाल्यामुळे सुधारीत प्रवास भाडे दर लागू करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणच्या (State Transport Authority) बैठकीत झालेल्या ठरावानुसार दरवाढीस संचालक मंडळाने (Board of Directors) मंजुरी दिल्याने शुक्रवार 24 जानेवारी रोजीच्या मध्यरात्री म्हणजे शनिवार 25 जानेवारी रोजीच्या 12 वाजेपासून अचानक एस.टि. बसच्या टिकिट दरात वाढ करण्यात आली. या भाडे दरवाढीमुळे गंगाखेड ते परभणी प्रवासासाठी आता 60 रुपयांऐवजी 71 रुपये, लोहा प्रवासासाठी 70 रुपयांऐवजी 81 रुपये, नांदेड 125 रुपयांऐवजी 142 रुपये, परळी 55 रुपयांऐवजी 61 रुपये, अंबाजोगाई 90 रुपयांऐवजी 102 रुपये, अहमदपूर 80 रुपयांऐवजी 91 रुपये, लातूर 175 रुपयांऐवजी 202 रुपये, गंगाखेड ते नाशिक 655 रुपयांऐवजी 755 रुपये, धर्माबाद 235 रुपयांऐवजी 272 रुपये याप्रमाणे प्रवास भाडे मोजावे लागणार असल्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांच्या (Passengers) खिशाला मोठी कात्री लागली आहे. यातच प्रवासासाठी लागणाऱ्या एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यावरून वाहकांची सुद्धा मोठी डोकेदुखी वाढल्याचे पहावयास मिळत आहे.
गंगाखेड आगारातून लांब पल्ला वाहतुक टिकीट दर.
गंगाखेड ते नाशिक 755 हाफ 378,
पूणे (वल्लभनगर) 684 हाफ 343,
आळंदी (सोनपेठ मार्गे) 694 हाफ 348,
आंळदी (अंबेजोगाई मार्गे) 705 हाफ 353,
भूसावळ (बूलढाणा) 634 हाफ 318,
धर्माबाद 272 हाफ 137,
शेगाव (गजानन महाराज) 504 हाफ 252 याप्रमाणे गंगाखेड आगाराचे नवीन टिकीट दर आहेत.
गंगाखेड आगारातील ग्रामीण टिकीट दर
गंगाखेड ते परभणी 71 हाफ 36,
लोहा 81 हाफ 41,
अहमदपुर 91 हाफ 46,
लातूर (धर्मापूरी मार्गे) 142 हाफ 71,
नांदेड 142 हाफ 71,
सोनपेठ (नरवाडी मार्गे) 71 हाफ 36,
सोनपेठ (शेळगाव मार्गे) 71 हाफ 36,
किनगाव (वागदरी) 71 हाफ 36 रुपये,
किनगाव (पिंपळदरी) 71 हाफ 36 रुपये,
मसला 26 हाफ 14,
राजूर 31 हाफ 16,
मानकादेवी 41 हाफ 21,
लातुर (अंबेजोगाई मार्गे) 202 हाफ 101,
परळी 61 हाफ 31,
अंबेजोगाई 91 हाफ 46 रुपये या प्रमाणे ग्रामीण टिकीट दर आहेत.