राज्य महामार्ग ६१ वरील घटना
परभणी/पाथरी (Pathari Accident) : राज्य महामार्ग ६१ वर खेर्डा शिवारामध्ये कार आणि दुचाकीचा अपघाता झाल्याची घटना मंगळवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली असुन अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
अपघाता विषयी मिळालेल्या माहितीनुसार पाथरी तालुक्यातील खेर्डा शिवारात राज्य महामार्ग ६१ वर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाथरीच्या दिशेने कार क्रमांक एम एच २० बीवाय ०७७० जात होती. (Pathari Accident) यावेळी दुचाकी क्रमांक एम एच २१ झेड ६२०६ विरुद्ध दिशेने जात असताना दोन्ही वाहनात अपघात झाला. यावेळी दुचाकी वरील अभिमान मळीबा ढवळे (वय ६० ) रा. पाथरगव्हाण (बु ) ता. पाथरी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अपघातातील कार मध्ये जखमीस पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले होते. या (Pathari Accident) ठिकाणी जखमी अभिमान ढवळे यांची डॉक्टरांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलेया अपघात प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.




 
			 
		

