वाहतूक कोंडीत भर, संबंधितांचे दुर्लक्ष
मानोरा (Manora Street Animals) : शहरातील वाहतूक व्यवस्था आधीच डोकेदुखीचा विषय ठरत आहे. यात मोकाट जनावरे अधिक भर घालत आहेत. ये – जा करण्याच्या मुख्य रस्त्यावर जनावरांचा वावर वाढला असून भर रस्त्यात ठिय्या मांडून बसलेले जनावर वाहतूक कोंडीत अडथळा निर्माण करत आहे. यामुळे (Manora Street Animals) किरकोळ अपघातात वाढ झाली असून या सर्व प्रकाराकडे नगर पंचायत व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षितपणा कारणीभूत असुन दोन्ही विभागाचा विसंवादाचा फटका शहर वाशियाना भोगावा लागत आहे.
मानोरा शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण या सर्वामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर वाढलेली वाहन धारकांची संख्या सबंधित विभागाला पेलवत नसल्याचेही दिसून येत आहे. या समस्यांचा सामना करीत असतानाच आता (Manora Street Animals) मोकाट जनावरांचा शहरातील प्रमुख चौकामध्ये सुळसुळाट वाढल्याने वाहन धारकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.
जनावरांना वाचविण्याच्या नादात अपघात घडून येत आहेत. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. दिवसेंदिवस रस्त्यावर जनावरांचा ठिय्या दिसून येत आहे. परंतू नगर पंचायत व पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केल्या जात नाही. यामुळे (Manora Street Animals) मोकाट जनावरांची समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने ताळमेळ बसवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक व शहरवासीयाकडून केली जात आहे.




