Pradhan Mantri Awas Yojana :- प्रधानमंत्री (Prime Minister) आवास योजनेंतर्गत गरीब, गरजू नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता. यामध्ये राज्य व केंद्र सरकारमार्फत (Central Govt) प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आरमोरी नगरपरिषद अंतर्गत ६७७ घरकुले मंजूर झाली असून त्याचा पहिला हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने दिवाळीच्या तोंडावर लाभार्थ्यांची आर्थिक अडचण झाली असून शासनाने तात्काळ घरकुलाचा हप्ता देण्यात यावे अशी मागणी घरकुल लाभार्थ्याकडून करण्यात येत आहे.
पहिला हप्ता मिळालाच नाही, लाभार्थी अडचणीत
शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक योजना म्हणजे घरकुल योजना यामध्ये शहरात नगर परिषदेने(City Council) मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिली.यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या नव्या घरकुलाचे बांधकाम सुरू केले.फाउंडेशन, खिडकी लेवल पर्यंत बांधकाम आले तरी लाभार्थ्यांना अद्याप पहिला हप्ता मिळेनासा झाला.त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून आरमोरी निधीअभावी प्रधानमंत्री आवास योजनेलाच घरघर लागलेली असल्याचे दिसून येत आहे. शहरात ६७७ लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे.
लाभार्थ्यांनी बांधकाम साहित्य पुरवठादार यांच्याकडून मिळणार्या हप्त्याच्या भरवशावर उधारीवर बांधकाम साहित्याची उचल केलेली आहे. तर इतर वरकड खर्चासाठी व्याजाने अथवा स्त्रीधन गहाण ठेवून किंवा मोडून पैशाची उचल केली आहे. बांधकाम दुकानदार घरकुल लाभार्थ्यांना दिवाळीच्या तोंडावर पैशाची मागणी करू लागल्याने काय करावे ,काय नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रदीर्घ विलंबनामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.