पंतप्रधान मोदींनी थायलंडमध्ये सांगितल्या 5 मोठ्या गोष्टी
थायलंड (PM Narendra Modi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडला पोहोचल्यानंतर, तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. बँकॉकमधील सरकारी निवासस्थानी थायलंडचे पंतप्रधान (Prime Minister of Thailand) पतोंगटार्न शिनावात्रा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी थायलंडचे पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांची येथे भेट घेतली आणि सामंजस्य करारांचे आदानप्रदान केले.
PM Shri @narendramodi and PM Shinawatra at the joint press meet in Bangkok, Thailand. https://t.co/pBfr03Huki
— BJP (@BJP4India) April 3, 2025
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत आणि थायलंडमधील संबंधांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, भारत आणि थायलंडमधील शतकानुशतके जुने संबंध आपल्या खोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक धाग्यांशी जोडलेले आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराने आपल्या लोकांना जोडले आहे. आयुथय ते नालंदा येथे विद्वानांची देवाणघेवाण झाली आहे. रामायणाची कथा थाई लोकांच्या जीवनात खोलवर रुजलेली आहे. संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव आजही भाषा आणि परंपरांमध्ये दिसून येतो. रामायणातील कथा थाई लोकांच्या जीवनाचा एक भाग आहेत.
#WATCH | Bangkok, Thailand | Prime Minister Narendra Modi arrives to take part in 6th BIMSTEC Summit, received by Thai PM Paetongtarn Shinawatra
(Source: ANI/DD) pic.twitter.com/mUlIeirFTl
— ANI (@ANI) April 4, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “भाषा आणि परंपरांमध्ये संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव अजूनही दिसून येतो. माझ्या भेटीच्या स्मरणार्थ 10 व्या शतकातील ‘रामायण’ भित्तिचित्रांवर आधारित एक विशेष टपाल तिकिट जारी करण्यात आल्याबद्दल मी थायलंड सरकारचे आभार मानतो. (Prime Minister of Thailand) पंतप्रधान शिनावात्रा यांनी नुकतेच मला त्रिपिटक भेट दिली. मी बुद्ध भूमी भारताच्या वतीने हात जोडून ते स्वीकारले.”
Had a very fruitful meeting with Prime Minister Paetongtarn Shinawatra in Bangkok a short while ago. Expressed gratitude to the people and Government of Thailand for the warm welcome and also expressed solidarity with the people of Thailand in the aftermath of the earthquake a… pic.twitter.com/JD9U1sONy2
— Narendra Modi (@narendramodi) April 3, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणात आणि आमच्या इंडो-पॅसिफिक दृष्टिकोनात थायलंडचे विशेष स्थान आहे. आज आम्ही आमच्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सुरक्षा संस्थांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक डायलॉग’ स्थापित करण्यावर देखील चर्चा केली. आम्ही भारताच्या ईशान्येकडील राज्ये आणि थायलंड यांच्यातील पर्यटन, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रात सहकार्यावर भर दिला आहे. आम्ही परस्पर व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय देवाणघेवाण वाढवण्याबद्दल बोललो. एमएसएमई, हातमाग आणि हस्तकला क्षेत्रात सहकार्यासाठी करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली आहे.