अनेक कवींनी आपल्या बहारदार एक से एक कविता सादर केल्या!
हिंगोली (Poetry Gathering) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंगोलीत भर पावसात रंगले पावसाच्या सरी राज्यस्तरीय कविसंमेलन (State-Level Poetry Conference). या कविसंमेलनात सौ. सिंधूताई दहिफळे यांच्या बांधावरच्या पोशिंद्याचं ऐका गाऱ्हाणं साहेब शेतीला हमीभाव लागू करा कर्ज काढून शेतकऱ्यानं, पेरलं होत रान शिक्षण घेतात पोरं त्यांची खाजगी सावकारीन शेतकऱ्यांचा माल विकतो कमी दरान साहेब शेतीला हमीभाव लागू करा.. या कवितेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर राजकुमार नायक यांच्या टिव्ही वाले साहेब जरा ऐका धीरान भिजलेल्या सोयाबीनची बातमी करा या कवितेने श्रोत्यांची मने जिंकली. तर विजय गुंडेकर यांच्या पोत मोडून केली होती,रानात फवारणी या कवितेने शेतकऱ्यांचे भीषण वास्तव मांडले. या कविसंमेलनात (Poetry Gathering) अनेक कवींनी आपल्या बहारदार एक से एक कविता सादर केल्या आणि बळीराजाचे दुःख कवितेतून शासानापुढे मांडले.खर तर या कविसंमेलनाचे नाव जरी पावसाच्या सरी होते पण त्याच पावसाच्या सरी कशा शेतकऱ्याला घाईस आणतात आणि उद्ध्वस्त करतात याचे कवितेतून जणू प्रतिबिंब उमटत होते.जो तो आपल्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख मांडते होते.
पाऊस असूनही खूप मोठी गर्दी कवींची आणि श्रोत्यांची जमली!
या कविसंमेलनात नागपूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीतील कवींनी उत्स्फर्त सहभाग घेतला.पाऊस असूनही खूप मोठी गर्दी कवींची आणि श्रोत्यांची जमली होती, सौ.सिंधूताई दहिफळे अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य आणि व्ही.डी.देशमुख अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष हिंगोली यांच्या वतीने उपस्थित सर्व कवींचा यथोचित सन्मान करण्यात आला.या कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून हरिभाऊ मुटकुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सचिव हिंगोली हे उपस्थित होते.तर कविसंमेलनाचे उद्दघाटक म्हणून राजकुमार नायक रानकवी परभणी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी हणून उषाताई ठाकूर नांदेड ,नागोराव डोंगरे उमरी उपस्थित होते.
कवी कवयित्री उपस्थित!
कविसंमेलनाचे सुत्रसंचलन सदानंद सपकाळे आणि अनुरत्न वाघमारे यांनी केले.तर आभार गजानन बोरकर केंद्रप्रमुख डिग्रस यांनी मानले.कविसंमेलनात खालील कवींनी उपस्थित राहून आपल्या बहारदार कविता, गजला सादर केल्या,हंसराज कांबळे नागपूर प्रज्ञाधर ढवळे नांदेड अनुरत्न वाघमारे नांदे, मारोती मुंडे नांदेड, बालिका बरगळ नांदेड,सौ.सुनंदा भगत नांदेड,सौ.सुमनताई जिरोणेकर नांदेड,शंकर माने जिंतूर,किरण जोशी जिंतूर,शारदा वानखेडे परभणी,आबा पांचाळ वसम,शिवशरण गुरुजी रटकलकर हिंगोली,गंगाधर हरणे वसमत,राजकुमार मोरगे,शिवाजी कऱ्हाळे डिग्रस कऱ्हाळे,)बालाजी शेळके हिंगोली,समाधान लोणकर राहोली बुद्रुक,डॉ.निखील नायक सवनेकर ,डॉ.गायत्री दरगु हिंगोली पल्लवी अटल हिंगोली,रसिका विडोळकर , हिंगोली,केदार शेवाळकर, हिंगोली, द.आ.गुडूप वाकोडी ,बी. एच.पुरी इडोळी,ज्योती पतिंगराव कळमनुरी,गणेश जायभाये परभणी,कवयित्री होडबे ताई कळमनुरी,कवी लक्ष्मण काळे परभणी,अक्षय देशमुख सेनगा,कोंडीबा गायकवाड सेनगाव,शंकर आवटे साळवा, सौ. अर्चना चाटसे हिंगोली, रुपाली वागरे नांदेड,कैलास कावरखे गोरेगाव, संदीप पाटील गोरेगावकर, श्री.मदन अंभोरे वसमत, शेख पिरान शेख चाँद वसमत, बबनराव मोरे हिंगोली, मनोहर गायकवाड डोंगरकडा आदी कवी कवयित्री उपस्थित होते.