तहसीलदार यांना निवेदन
मानोरा () : तालुक्यातील शेंदूरजना आढाव सर्कलमधील अतिवृष्टी बाधीत सरसकट शेतकऱ्यांना तातडीने पिकांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन दि. ४ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी दिले आहे.
तालुक्यातील शेंदूरजना सर्कल परिसरात शेंदुरजना आढाव, रुई, गोस्ता, मेंद्रा, वटफळ, इंगलवाडी, हिवरा खुर्द, कारपा ढोनी, उज्वलनगर, पाळोदी रणजीतनगर या शेतशिवारात दि. २९, ३०, ३२ जुलै ऑगस्ट व २ सप्टेंबर या चार दिवस झालेल्या सततच्या पावसानं शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सोयाबीन तूर कपाशी ज्वारी व इत्यादी पीके पिवळे होऊन वाळत आहे. आणि ऑगस्ट महिन्यात सतत दोन – तीन वेळ ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rains) झाल्यामुळे शेतीचे बांध फुटून माती व गाळ वाहून जाऊन शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. वाशिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व भौगोलिकदृष्ट्या तेथे पडलेला पाऊस हा आमच्या भागात जात असलेल्या पूस नदीने येतो त्या पावसामुळे आमच्या परिसरातील शेतीचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आमचा भाग हा जिल्ह्यातील मागास व डोंगराळ असून कोरडवाहू शेतीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे, आणि आमच्या शेतात बहुतांश शेतकरी हे एका खरीप पिकावर अवलंबून असतात आणि यावर्षी पुरामुळे व सततच्या पावसामुळे (Heavy Rains) पूर्ण पीक वाया गेले आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसानीची सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी पिडीत शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे, माजी प. स. सदस्या सौ. रेखाताई पडवाळ, बाजार समितीचे उपसभापती भुजंगराव राठोड, पूजा गणेश काळे सरपंच शेंदुर्जना ग्रा. प. सरपंच पूजा गणेश काळे, रुई ग्रा. प. उपसरपंच धनश्री रुंदन गावंडे, कारपा ग्रा. प. सरपंच राजू विष्णू मनवर, मंगेश राठोड, गोस्ता ग्रा. प. सरपंच लीना ताई सचिन गावंडे, मेंद्रा इंगलवाडी ग्रा. प. सरपंच अरविंद खडसे, हरिओम गावंडे, गणेश रामचंद्र रबडे, कृष्णा गणेश ब्राह्मण, श्याम गावंडे, इंदल जाधव, गणेश राठोड, अविनाश राठोड, सुभाष राठोड, सुभाष साबळे, आत्माराम साबळे, प्रकाश ठोंबरे, गणेश गावंडे, अविनाश गावंडे, विलास आडे, पंजाबराव आडे, रुंदन गावंडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.