रेल्वे अधिकारी की पुल बांधकाम करणारा कंत्राटदार जबाबदार?
पूर्णा (Purna Railway Bridge) : शहराजवळ असलेल्या नदीवरील रेल्वे पुलाचा भराव खचल्याचा प्रकार पुढे आला आहे. सदर प्रकार गँगमनच्या नजरेत आल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुलाचा भराव खचल्याने संबंधीत निष्काळजीपणाला (Purna Railway Bridge) रेल्वे अधिकारी कि पुल बांधकाम करणारा कंत्राटदार जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पूर्णा आणि थुना नदीच्या संगमावर असलेल्या नगर परिषद पाणी पुरवठा पंपींग स्टेशन जवळील रेल्वेच्या दुहेरी पुलाच्या डाव्या बाजुला पुल आणि पटरीच्या बाजुने लावलेला माती, मुरुमाचा भराव खचला. अतिवृष्टीने पूर्णा नदीला (Purna Railway Bridge) आलेल्या पुराच्या पाण्याने भराव खचल्याचा प्रकार शनिवार ४ ऑक्टोबरच्या सकाळी उघडकीस आला.
घटनास्थळावर रेल्वे अधिकारी, कर्मचार्यांनी भेट देत मुरुम आणि गिट्टीचा भराव टाकण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे. या (Purna Railway Bridge) प्रकाराबाबत रेल्वेच्या पूर्णा येथील देखभाल दुरुस्ती विभागाच्या अधिकार्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. सदर प्रकाराला कंत्राटदार जबाबदार असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली आहे.