महामार्ग अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे…
जळकोट (Jalkot) : नांदेड, कंधार, जळकोट, उदगीर, बिदर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 चे काम पूर्ण होऊनही जळकोट तालुक्यातून वाहणाऱ्या तिरू नदीवर फुलाचे काम अद्याप अपूर्ण असून यासाठी दिलेल्या पर्यायी रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने अपघात घडत आहेत. या पुलाचे काम तात्काळ करावे या मागणीसाठी जळकोटकरांनी प्रजासत्ताक दिनी या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे (Movement) रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकाऱ्यांनी (National Highways Department Officer) आंदोलन स्थळी येत 15 दिवसात रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता रोको मागे देण्यात आले.
या आंदोलनात सरपंच सुनीता खटके, उपसरपंच तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती पांडे, काँग्रेस शहर अध्यक्ष महेश धुळशेट्टे, पाटोदा सरपंच सुनील नामवाड, कोळंनूरचे चेअरमन बालाजी शिवशेट्टे, ऍड श्रीनिवास मंगनाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गंगाधर गिरदवाड, संचालक आशिष पाटील, माजी सरपंच व्यँकट खटके, रमाकांत मद्देवाड, अंगद जाधव, पांडुरंग जाधव, तुकाराम सवारे, उद्धव पाटील, राजीव पाटील, नागनाथ कराड, पंढरी जाधव, जनार्धन घोनशेट्टे. ऍड. केशव पांडे, सत्यम लांडगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, तहसीलदार राजेश लांडगे, महामार्ग अभियंता सोनटक्के, तलाठी पाटील. ग्रामसेवक श्याम पाटील, अंकुश पाटील, दयानंद पाटील, जयंत पाटील, वेंकेट सवारे, बाबु गायकवाड, नामदेव मुंडकर आदींसह गांवकरी (Villager) मोठया संख्येने उपस्थित होते.
रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय!
पुलाचे काम होत असल्याने दिलेला पर्यायी रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, आजपर्यंत 7 जणांना या खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग असून या ठिकाणच्या रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या ठिकाणाहून वाहतूक करत असताना वाहक चालकांना (Carrier Driver) तारेवरची कसरत करावी लागत आहे. हातात जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत.



 
		

