औंढा नागनाथ (Aundha RSS Rally) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शुक्रवारी ३ ऑक्टोंबर रोजी पथसंचलन करण्यात आले. हे पथ संंचलन येथील बाजार मैदान, डॉ. हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, जोशी गल्ली, रहीम चौक, कासार गल्ली, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉ खतीब चौक, शिवाजी चौक, सोनार गल्लीमार्गे बाजार मैदानात पथसंचलनाचा समारोप झाला.
या (Aundha RSS Rally) पथसंचलनाच्या मार्गावर महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून पुष्पवृष्टी करीत स्वयंसेवकाचे स्वागत केले. यावेळी पोलीस निरक्षक जी.एस राहिरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.