जवळपास एक लाख भाविकांच्या उपस्थितीची शक्यता
औंढा नागनाथ (Srikshetra Aundha Nagnath) : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे शनिवारी १ फेब्रुवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास रथोत्सवाचा कार्यक्रम होणार असून यावेळी सुमारे एक लाख पेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने (Srikshetra Aundha Nagnath) नागनाथ संस्थान व पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या (Srikshetra Aundha Nagnath) औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवा निमित्त यात्रा महोत्सव सुरु आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या रथोत्सवाचा कार्यक्रम शनिवारी आज १ रात्री १० वाजता होणार आहे. यावेळी नागनाथ संस्थानचे कर्मचारी व काही भाविकांकडून रथ ओढल्या जाणार असून रथाच्या मंदिराला पाच प्रदक्षिणा घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या वतीने रथाची तपासणीही करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरातही या श्वानपथकाने तपासणी केली.
दरम्यान, रथोत्सवाच्या काळात मंदिरात सुमारे १ लाखापेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यानुसार भाविकेच्या सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून
पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी पाहणी केली. या परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात केले जाणार असून छायाचित्रीकरण केले जाणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
नागनाथ संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे नागनाथ संस्थांचे अध्यक्ष वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्यासह नागनाथ संस्थानचे कर्मचारी हा रथ ओढणार असून मंदिराला पाच प्रदक्षिणा घेतल्या जाणार आहेत. रात्री १२ वाजता रथोत्सव सांगता होणार आहे. तसेच (Srikshetra Aundha Nagnath) औंढा नागनाथ नगरपंचायत कडून भव्य कुस्त्यांची दंगल सकाळी ११ वाजता पासून सुरू होणार आहे.
प्रथम बक्षीस ३१ हजार २२५ व्दितीय बक्षीस २१ हजार २२५ तृतीय बक्षीस ११२२५ राहणार आहे. (Srikshetra Aundha Nagnath) तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त आज १ मार्च शनिवार रोजी श्री नागनाथ मंदिरामध्ये रथोस्तव चा कार्यक्रम होणार असल्याने भाविकासह कुस्ती पैहलवानांनी सहभागी होण्याचे आवाहन नगरपंचायत ने केले आहे. दुपारी दोन ते पाच उपस्थित भाविकांना श्रीचा महाप्रसाद मिळणार आहे. दोन मार्च रोजी सकाळी नऊ ते ११ दरम्यान काल्याचे किर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याच्या आवाहन नागनाथ संस्थांच्या वतीने केले आहे.