डाॅगस्काॅड, फाॅरेंन्सीक च्या माध्यमातुन तपास सुरू
रिसोड (Risod Burglary Case ) : तालुक्यातील भर जहागीर येथिल बबनप्पा दगडाप्पा महाजन आणि शिवप्रसाद नामदेव लहामगे यांच्या घरातील सोन्या-चांदीच्या दागदागीण्यासह,एलसिडी सारख्या साहीत्या जबरी जोरीची घटना ता.25 सप्टेंबर ला रात्री 1 च्या दरम्यान घडली. सदर घटनेमध्ये सुमारे साडे दहा लक्ष रूपयांच्या ऐवजाचा समावेश आसल्याची बबनप्पा महाजन यांनी माहिती दिली. (Risod Burglary Case) घटनेचे गांभीर्य पाहात वाशीम येथुन डाॅगस्काॅड, फाॅरेंन्सीक च्या माध्यमातुन तपास सुरू होता.
मागील काही दिवसांपासून भर दिवसा घरफोड्या, लुटीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आशातच ता.25 सप्टेंबर ला भर जहागीर येथिल बबनप्पा काष्टे व शिवप्रसाद लहामगे यांच्या घरातील दरवाजाचे कडीकोंडा आतील बाजुने तोडुन महाजन यांच्या घरातील लोखंडी पेटीतील 12 तोळे सोन्याचे दागीने व चांदीचे 72 तोळ्याचे दागीन्यासह रोख 78000/ रूपयांची चोरी (Risod Burglary Case) झाली तर शिवप्रसाद लहामगे यांच्या मागील घरातील एक एलसीडी टिव्ही, सेटआॅप बाॅक्स ची चोरी झाली आहे.
घटनेची माहीती बबनप्पा महाजन हे मध्यरात्री उठले आसता लक्षात येताच तात्काळ 112 क्रमांकावर माहीती देताच रिसोड पोलिस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. (Risod Police) पोलिस उपनिरीक्षक शिवचरण डोंगरे यांनी (Risod Burglary Case) घटनेचे गांभीर्य ओळखत वाशीम येथिल डाॅगस्काॅड पथक, फाॅरेन्सीक पथकाला पाचारण केल्या नंतर सकाळी साडे दहा दरम्यान तपासणी मध्ये चोरट्याच्या मागाचा तपास सुरू होता. परंतु सदर घटनेने ग्रामस्थ घाबरलेल्याचे निदर्शनास येते. पोलिसांचा तपास सुरू आहे.