रस्त्यात खड्डे तर कुठे पूलाला सुरक्षा कठडे नाहीत!
कोरेगाप, चोप (Road Construction) : देसाईगंज तालूका हा जिह्यातील विकसीत तालूका असला, तरी अजुनहीअनेक समस्या आहेत यात प्रामुख्याने रस्त्यांची समस्या फार गंभीर स्वरुपाची आहे. रस्ते पक्के असले तरी डांबरीकर फुटलेले, पूल टूटलेले, रस्त्यात खड्डे, कुठे पूलाला सुरक्षा कठडे नाहीत, काही चोरीला गेले, तर काही तुटून पडले, तर कुठले अर्धवट कामे आहेत.
रस्त्यांवर नेहमीय वाहतुकीची वरदळ!
देसाईगंज तालूका जिल्हयातील मोठी बाजारपेठ असून चंदपूर, भंडारा, गोदीया या जिल्हयांना जोडलेला आहे. त्यामळे आजुबाच्या जिल्यातून व्यवसायासाठी व खरीदी साठी नागरीक येत असतात त्यामुळे या तालुक्यातील रस्त्यांवर नेहमीय वाहतुकीची वरदळ असते. त्यामळे रस्ते वारंवार खराब होत असतात. दुरस्तीच्या नावा खाली तात्पुरती डागडूगी केली जाते. परंतू काही दिवसातच रस्ते खराब होतात. या मध्ये वडसा फवारा चौक ते नैनपूर, वडसा ते कोकडी, वडसा ते शंकरपूर, कुरखेडा राज्य मार्ग जागोजागी फुटला पूला शेजारी भाडाद पडलेत. जोगिराखरा शंकरपूर ते चोप, कोरेगाव बोळधा या रस्त्याचा काम गेल्या वर्षीच्या जानेवारी पासून रखडलेला आहे, चोप ते पाटलीन तलाव, रस्ता फुटला आहे, कोरेगाव ते एकलपूर, रस्ता खराब झाला तर मोरी पूलाच्या स्लॅपला मोठे -मोठे दोन भगदाड पडलेत व रस्ता खराब झालेला आहे, तर जिल्हासिमार्वती रस्त्यांचे पण हाल काही वेगळे नाही वडसा ते गौरनगर, कोहमारा गोंदिया जिल्हा सिमावर्ती राज्यमार्ग, बोळधा ते खाळदा, केशोरी गोंदिया जिल्हा सिमार्वर्ती मार्ग, बोळधा नदी पूलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहेत बोळधा ते महागाव गोदीयां जिल्हा सिमार्वती मार्गाची अवस्था फार बिकट आहे चोप, कोरेगाव, बोळधा, रावनवाडी, बोरी येथिल विर्ध्यार्थी महागाव येथे शिक्षणासाठी जात आहेत. रस्ता पायी चालन्या योग्य पण नाही आहे. या सर्व तालुक्यातील मार्गांची दुरावस्ता झालेली असून, अपघातांचे प्रमाण वाढलेले आहेत, मोठा अपघात होण्याची सक्यताही नाकारता येत नाही. नागरीकांच्या अनेक निवेदने देऊननही काहीच फायदा होतांना दिसत नसल्याने कुंभकर्णी झोपेत असलेल्या, सरकारला (Govt) जाग कधी येनार असा संतप्तप्रश्र नागरीक करीत आहेत.
मुलभूत सुविधा चांगल्या करण्याची मागणी!
दिवसेन दिवस वाढता दळणवळ गरजा लक्षात घेऊन संबधीत विभागाने, प्रशासनाने, व जनप्रतीनीधींनी जनतेच्या समस्या कडे लक्ष देऊन रस्त्यान सारख्या मुलभूत सुविधा चांगल्या करण्याची मागणी प्रवाशांनी, व तालुक्यातील नागरीकांनी (Citizens) केली आहे.