हिंगोली (Junior Engineer Abuse) : तालुक्यातील दाटेगाव येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना सदर कामाची पाहणी करण्याकरता गेलेल्या कनिष्ठ अभियंत्यास सोमवारी शिवीगाळ करून रस्त्याचे काम बंद पडल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात (Junior Engineer Abuse) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ते लोहगाव रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू त्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिषेक ओमप्रकाश बुटोल हे 31 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास रस्त्याचे काम पाहण्याकरता दिले होते. (Junior Engineer Abuse) सदरील रस्त्याचे काम पाहत असताना विठ्ठल तानाजी माने याने कामाच्या ठिकाणी येऊन सदर काम कसे काय सुरू केले हे काम आत्ताच्या आत्ता बंद करा असे म्हणून चालू असलेले दाटेगाव ते लोहगाव दरम्यान रस्त्याचे काम बंद पाडले.
यावेळी त्यांना कनिष्ठ अभियंता (Junior Engineer Abuse) बुटोल यांनी विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात सोमवारी रात्रीच्या सुमारास कनिष्ठ अभियंता अभिषेक बुटोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल तानाजी माने राहणार दाटेगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे ह्या करीत आहेत.