भगवती चौक पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी
परभणी/गंगाखेड (Sarafa Association) : शहर परिसरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सराफा मार्केट मधील भगवती चौक पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी (Sarafa Association) सराफा व सुवर्णकार असोसिएशन संघटनेच्या वतीने पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
परभणीतील गंगाखेड येथील सराफा सुवर्णकार असोसिएशनची मागणी
गंगाखेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या दुकान, घरफोडीसह दुचाकी चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीच्या वाढत्या घटनां तसेच अन्य घटनांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या सराफा मार्केटमध्ये भगवती चौकातील श्री भगवती देवी मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीवर पूर्वी प्रमाणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे (Sarafa Association) सराफा सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सराफा, सुवर्णकार असोसिएशनचे गंगाखेड तालुकाध्यक्ष सचिन दहीवाळ, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नळदकर, राघवेंद्र पाठक, तालुका सचिव गोविंद रोडे, लक्ष्मीकांत अष्टेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.