Chandrapur crime :- जिल्ह्यातील बेपत्ता ६० मुली व महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता झालेल्या मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर ७ मिसिंग सेल व जिल्हा स्तरावर १ मिसिंग सेल असे एकूण ८ मिसिंग सेल (Missing cell) स्थापन केले असून सदरच्या मिसिंग सेल मध्ये एक पोलीस अधिकारी व चार पोलीस अंमलदार यांची नेमणूक केलेली आहे.
२४ पुरुष व एकूण २७ महिला असे एकूण ५१ महिला व पुरुषांचा शोध घेण्यास यश
उपविभागीय स्तरावर मिसिंग सेलचे नोडल अधिकारी हे संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना नेमण्यात आले आहेत, तर अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या अधिपत्याखाली जिल्हास्तरा वरील मिसिंग सेल कार्यरत आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व मिसिंग सेल द्वारे दि. २७ जुलै, २०२५ ते ६ ऑगस्ट, २०२५ या १० दिवसात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून घरुन निघून गेलेले, हरवलेले एकूण २४ पुरुष व एकूण २७ महिला असे एकूण ५१ महिला व पुरुषांचा शोध घेण्यास यश आले आहेत. तर अपहरण, पळविलेल्या एकूण २ अल्पवयीन मुले व ७ अल्पवयीन मुलींचा (Minor girls) शोध घेण्यास यश आलेला आहे.