Samudrapur Accident :- भरधाव वेगातील ट्रकने समोर असलेल्या ट्रकला (Truck)धडक दिली. त्यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३५ वाजताच्या सुमारास घडला.
भरधाव वेगातील ट्रकची समोर असलेल्या अज्ञात ट्रकला मागून जबर धडक
नागपूरकडून (Nagpur) युपी ३२ आरएन ९५०२ क्रमांकाचा ट्रक हैद्राबादकडे जात होता. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ नागपूर ते जाम मार्गावर जाम शिवारात भरधाव वेगातील ट्रकने समोर असलेल्या अज्ञात ट्रकला मागून जबर धडक दिली. त्यात ट्रकचालक शिवकुमार रामसिंग यादव (वय ४४) रा. सीतापूर उत्तरप्रदेश याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र जाम येथील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांच्यासह चंद्रकांत जीवतोडे, विकास काकडे, रणजित फाले, महेंद्र ठेंगळे यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य केले. ट्रकमध्ये अडकलेल्या शिवकुमार यादव यांना रुग्णवाहिकेने (Hospital) पाठविण्यात आले.
अपघात (Accident) स्थळावर सेफ्टी स्टाफच्या मदतीने बॅरिकेटिंग तसेच सेफ्टी कोण लावण्यात आलनेक. अपघातग्रस्त वाहन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. समुद्रपूर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू होती.