हिंगोली (Hingoli Dandiya Mahotsav) : येथे उत्सव फाउंडेशन तर्फे आयोजित दांडीया महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही येथील अकोला रोड भागातील तिरुमला लॉन्स येथे उत्सव फाउंडेशन आयोजित दांडिया महोत्सवाला पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांच्या हस्ते देवीचे पूजन करून दांडिया महोत्सवाला सुरुवात झाली. (Hingoli Dandiya Mahotsav) महोत्सवाचे उदघाटन उदघाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व आमदार तानाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट कपल जोडीत निलेश रेणू जैस्वाल व आकाश ज्योती गवळी हे बेस्ट कपलचे मानकरी ठरले आहेत. तर विशेष प्राईज मध्ये शिल्पा गुंडेवार व सौरभ रायसोनी हे बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.
येथे दसरा महोत्सवा निमित्ताने (Hingoli Dandiya Mahotsav) उत्सव फाउंडेशन तर्फे गेल्या अनेक वर्षापासून दांडीया महोत्सवाचे आयोजन केले जाते यावर्षी देखील मोठ्या उत्साहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले 25 ते 29 सप्टेंबर चालणाऱ्या दांडिया उत्सवात पहिल्या दिवशी बेस्ट, कपल, स्पेशल बक्षीस, लहान मुले, युवक व युवती आदींसाठी.स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पेशल प्राईज ठेवण्यात आले होते.
लहान मुला मुलीमध्ये वैभव साबु, शिवल दुबे, प्रगती दुबे, वेदिका धुत, कुश जैस्वाल, ऋषी रायसोनी, वेदांशी शर्मा, प्रगती सुर्वे यांचा समावेश आहे. युवती मध्ये प्रगती मुथा, निशा मंत्री, मुस्कान अग्रवाल, श्वेता चौदंते, वैष्णवी लदनीया, करुणा चौधरी यांचा समावेश आहे.
युवकामध्ये सौरभ अग्रवाल, सिध्दांत मुंदडा, पृथ्वी गहिलोत, विकी अग्रवाल यांचा समावेश आहे. बेस्ट कपल मध्ये निलेश रेणू जैस्वाल, आकाश ज्योती गवळी यांचा समावेश आहे. तर स्पेशल प्राईज मध्ये शिल्पा गुंडेवार व सौरभ रायसोनी, कनिष्क हेडा, शरया दायमा, श्रीकांत चितलांगे, डॉ. वैष्णवी वायचाळ, यश बडेरा, भाविका बडेरा यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी बक्षीस निवड समितीमध्ये पंकज राठोड, किरण अग्रवाल यांनी काम पाहिले. तर आभार प्रवीण सोनी व मुरली हेडा यांनी मानले.