काठमांडू/ नवी दिल्ली (Nepal Gen Z Protest) : Gen Z क्रांतीने नेपाळमध्ये राजकीय कहर माजवला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू सध्या भीती आणि अराजकतेच्या आगीत जळत आहे. सोशल मीडिया बंदी (Nepal Gen Z Protest) आणि भ्रष्टाचाराविरुद्ध Gen Z यांच्या नेतृत्वाखालील बंडामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली (PM KP Sharma Oli) यांना आज राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या (आरएसपी) 21 खासदार आणि 4 मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे ओली सरकार ठप्प झाले.
सर्वात धक्कादायक घटना म्हणजे, अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांच्यावर हल्ला (Nepal Gen Z Protest), त्यांचा संतप्त निदर्शकांनी पाठलाग करून मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना विमानाने हलवावे लागले. लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी ओली (PM KP Sharma Oli) यांना सत्तेवरून पायउतार होण्याची मागणी केली आणि आता नेपाळी सैन्य देश स्थिर करण्याची तयारी करत आहे. ओली दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिमालय एअरलाइन्सचे खाजगी जेट स्टँडबायवर आहे.
लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने युती तुटली
आज लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी ओली (PM KP Sharma Oli) यांना राजीनामा देण्यास सांगितले. ओली यांनी बिघडत चाललेली परिस्थिती हाताळण्यासाठी सिग्देल यांना विनंती केली, परंतु सिग्देल यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘तुम्ही सत्ता सोडली तरच सैन्य देश स्थिर करू शकते.’ ओली यांनी बालुवातारमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी सैन्याची मदत घेतली आणि दुबईला पळून जाण्याचा विचार केला. हिमालय एअरलाइन्सचे खाजगी जेट त्रिभुवन विमानतळावर स्टँडबायवर आहे आणि ओली यांनी वैद्यकीय उपचारांसाठी सबब सांगितली आहे. अखेर ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
काठमांडूमध्ये रक्तरंजित गोंधळ:
काल उशिरा झालेल्या आपत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीत ओली (PM KP Sharma Oli) सरकारने 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब इ.) बंदी उठवली. परंतु हा निर्णय Gen Z शांत करण्यात अयशस्वी ठरला. मंगळवारी सकाळी काठमांडूमधील मैतीघर मंडला, न्यू बानेश्वर आणि कलंकी येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. निदर्शकांनी रिंग रोडवरील रस्ते अडवले, संसद भवनाजवळील बॅरिकेड्स तोडले आणि राष्ट्रध्वज घेऊन घोषणा दिल्या – ‘ओली राजीनामा द्या’, ‘भ्रष्टाचार थांबवा’.
दुसरीकडे, 4 मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. (Nepal Gen Z Protest) यामध्ये गृहमंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल आणि पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव (जनता समाजवादी पक्ष) यांचा समावेश आहे.