राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
हिंगोली (Soybean Buying Center) : जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याला भाव देखील योग्य प्रमाणात मिळत नाही यामुळे शासनाच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७ आक्टोबर शुक्रवार रोजी करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्हयात सोयाबीन उत्पन्नामध्ये (Soybean Buying Center) घट झाली आहे. रबी हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे. यासारी लागणारे पैसे शेतकऱ्यांना शासनाकडून पूर्णतः अद्याप मदत झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाची विक्री करणे गरजेचे झाले आहे.
हिंगोली जिल्हयात प्रमुख पिक सोयाबीन आहे. बाजारात सोयाबीनला केवळ 3500 से 4000 पर्यंत भाव मिळत आहे. सोयबीनचा हमी भाव 5328 रु. आहे. परंतु जिल्हयात हमीभावाने सोयाबीन खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे फार मोठे नुक्सान होत आहे. हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू करावी तसेच यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयबीनचा माल विकला आहे त्यांना फरकातील रक्कम देण्यात यावी तसेच हमीभावाने सोयाबीन खरेदी करावे अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अँड. रवी शिंदे, माधव कोरडे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, मुनीर पटेल, काकडे, रमेश जाधव, शहराध्यक्ष मुजीब पठाण, गजानन चव्हाण, माणिकराव सावंत आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.