वलांडी (Students Death) : देवणी तालुक्यातील धनेगाव येथे बारावीचा विद्यार्थी गुणवंत उर्फ प्रथमेश धनाजी सोमवंशी याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. नदीत गेलेल्या म्हशीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तो (Students Death) स्वतःच पाण्यात गेला आणि पोहता न आल्याने त्याचा मृत्यू झाला.
गुणवंत हा श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी कला शाखेचा विद्यार्थी होता. त्याचे वडील पुण्यात मजुरी करतात, तर आई रोजंदारीवर काम करते. घरची परिस्थिती अत्यंत साधारण असल्याने तो आईला मदतीसाठी शेतात जात असे. मंगळवारी परीक्षा नसल्याने तो आईसोबत शेतात गेला होता. त्यावेळी म्हैस नदीत गेली, तिला बाहेर काढण्यासाठी गुणवंत पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता न आल्यामुळे तो बुडू लागला. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या (Students Death) शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला, पण त्याला वाचवणे शक्य झाले नाही.
दरम्यान उदगीर येथील अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी मृतदेह शोध कार्य सुरू केले असून सायंकाळपर्यंत त्यात यश आले नव्हते. अंधार पडल्यानंतर पथकाने शोधकार्य थांबविले असून उद्या सकाळी पुन्हा (Students Death) मृतदेहाचा शोध घेण्यात येणार आहे. सध्या मांजरा नदीपात्रात पाण्याचा साठा असल्याने या पाण्यात गुणवंत बुडाल्याची घटना हंचनाळ शिवारात घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक ओढवलेल्या या संकटाने सोमवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




 
		

