खून करून टाकले; सीसीटीव्हीमध्ये कैद!
गाझियाबाद (Suitcase Murder) : सीमा पोलीस स्टेशन (Sima Police Station) परिसरातील शिव वाटिका कॉलनीतील बेहट कालव्याजवळ मंगळवारी सकाळी एका अज्ञात 25 वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. मृतदेह पाहिल्यानंतर, रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.
सूटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह!
पोलिस महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एसीपी अंकुर विहार अजय कुमार यांनी सांगितले की, शिव वाटिका कॉलनीसमोरील बेहटा कॅनॉल रोडवर सकाळी 7 वाजता हिरव्या रंगाच्या सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह (Woman Deadbody) आढळल्याची माहिती मिळाली.
महिलेच्या शरीरावर जखमांच्या खुणा!
पोलिसांनी सुटकेस (Suitcase) उघडली, तेव्हा त्यात सुमारे 25 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह सुटकेसमध्ये हात आणि पाय दुमडून ठेवण्यात आला होता. मृतदेहाच्या नाकावर आणि तोंडावर रक्त आढळून आले आहे आणि मानेवर खुणा आढळून आल्या आहेत.
मृत महिला विवाहित आहे- पोलिस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या केसांमध्ये सिंदूर आहे आणि पायात जोडवे आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एसीपी म्हणाले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर, मृत्यूचे नेमके कारण कळेल. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) तपासले जात आहेत.