हिंगोली (Tiranga Yatra) : पाकिस्तान विरोधात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपर्यात पोहोचण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय एकता आणि तिरंगा ध्वजाचा (Tiranga Yatra) सन्मान वाढवण्याच्या दृष्टिकोनाने हिंगोलीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तिरंगा यात्रे (Tiranga Yatra) निमित्त राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आ. तान्हाजीराव मुटकुळे, माजी. आमदार रामराव वडकुते, फुलाजीराव शिंदे, बाबाराव बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यात्रेची सुरुवात १७ मे शनिवार रोजी सकाळी ९ वाजता गांधी चौक ते शहरातील प्रमुख मार्गावरील मार्गस्थ करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,शासकीय विश्रामगृह येथे यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. या (Tiranga Yatra) तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी केले आहे.