ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
अफजल मोमीन
लातूर (Farmer loan waiver) : अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे शेतकरी सहदेव होनाळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मागील दहा दिवसांपासून विधानभवनाकडे पायी प्रवासात निघाले आहेत. ते रविवारी मुंबई जवळ ठाणे येथे पोहचले असता मुंबई येथील दमट हवामानामुळे अचानक तब्येत बिघडली असून सोबती गणेश सूर्यवंशी यांनी तेथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांनी अशक्तपणा व शुगर वाढल्याने अस्वस्थता आली असून उपचारासाठी ॲडमिट व्हावे लागेल, असे सांगितले आहे.
सहदेव होनाळे हे सुशिक्षित शेतकरी असून ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पाठपुरावा करत होते. परंतु, त्यांनी दिलेल्या निवेदनाची सरकार दरबारी कोणतीही दखल घेतली जात नव्हती. अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावातील (Farmer loan waiver) शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतःला औताला जुंपल्यानंतर त्यांना राज्याचे कृषिमंत्री तसेच सहकार मंत्री यांनी फोन करून त्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले आणि ते पूर्णही केले.
परंतु संपूर्ण राज्यांमध्ये असे लाखो शेतकरी आहेत ज्यांची परिस्थिती ही अतिशय नाजूक आणि बेताची झालेली आहे. त्यांच्या बाबतीत सरकार मात्र उदासीन आहे, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer loan waiver) मिळावी. तसेच शेतीतील कामासाठी रोजगार हमी योजना लागू करावी, ट्रॅक्टर खरेदीसाठी जसे शासन अनुदान देते त्याच धर्तीवर बैल खरेदी करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे. शेतकऱ्यांना लाभ होईल, अशा पद्धतीने राज्यात पीकविमा योजना राबवावी. शेतकऱ्यांच्या पिकांना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्यात यावा, अशा मागण्यांचे निवेदन देऊन त्यांनी गेल्या दहा अकरा दिवसापासून अहमदपूर ते मंत्रालय असा पायी चालत प्रवास करत आहेत.
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…
ते सध्या मुंबई जवळ ठाणे जिल्ह्यात पोहचले आहेत. एक (Farmer loan waiver) शेतकरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानभवनाकडे खांद्यावरत नांगर घेऊन पायी प्रवास करत आहे. म्हणून सहदेव होनाळे यांचे मित्र गणेश यांनी साथ देण्याची मनात खूणगाठ बांधली आणि तेही कांही अंतरावरून सोबत जाण्यासाठी निघाले. दोघेही ठाणे जिल्ह्यात प्रवेश करताच सहदेव होनाळे यास अस्वस्थ वाटू लागल्याने शासकीय जिल्हा रुग्णालय ठाणे येथे सोबती गणेश यांनी ॲडमीट केले आहे. शुगर लेवल वाढल्याने तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू करून सध्या आराम करण्याचा सल्ला दिला आहे.




