Tumsar :- सामान्य नागरिकांना शासकीय व निमशासकीय आणि इतरत्र ठिकाणी उपयोगासाठी जन्म मृत्यूचे दाखले (Death certificates) अत्यंत आवश्यक असते. त्यावेळेस नायब तहसीलदाराने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सदर दाखले देण्यात आले होते. परंतू सदर दाखले शासनाने रद्द करण्यात आल्याचे फरमान तहसीलला देण्यात आले. त्यामुळे महसूल (revenue) अधिकार्यांनी दिलेले मूळ दाखले परत मागण्याकरीता महसुलीची चांगलीच तारांबळ उडली आहे तर दाखलकर्त्यांची एकप्रकारे फजिती केली आहे.
मूळ दाखले परत मागावे त्याकरीता महसूलीची तारांबळ
सदर फरमानात जिल्हाधिकारींनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना प्रदान केले होते. पण आवश्यक गरजेनुसार व सामान्यांची अडचण लक्षात घेता जन्म मृत्यूचे दाखले नायब तहसीलदारांनी दिले होते. परंतू दि.११ सप्टेंबर २०२३ पासून ते २१ जानेवारी २०२५ पर्यंतचे स्थागिती आदेशापर्यंत निर्गमीत केलेले जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे लेखी सूचना आले आहे. त्या सदर फरमानात तहसीलदार तथा दंडाधिकारी यांचे पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकार्यांनी निर्गमीत केलेले दाखले रद्द केले आहे. परंतू सदर अवधीतले अनेकांनी दाखले उपयोगी आणल्याने बहुतांश सामान्य नारिकांचे अडलेले कामे सोयस्कर झाले. पण याकडे शासनाने विचार न करता मूळ दाखले परत मागण्याकरीता महसुलीच्या आदेशाने तलाठी व ग्रामसेवक दारोदारी जात असून दाखलेकर्त्यांनी मूळ दाखले परत देण्यासाठी नकार दिले जात आहे. कारण दाखलेकर्त्यांची शासनाने फजिती केली आहे. तो सदर आदेश रद्द करावा, अशी दाखलेकर्त्यांची ओरड आहे.