लाकडे भरून नेणारा ट्रक मुख्य चौकात पलटला
धानोरा (Dhanora Accidents) : मागील काही महिन्या पासून राष्ट्रीय महामार्गचे रुंदीकरण व सिमेंट रस्त्याचे सुरु असून कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. अवकाळी पावसामुळे पूर्णपणे खोदलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्यावरून पायी व दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. अशातच आज २७ मे रोजी अवजड ट्रक फसल्याने चालक व वाहक आतमध्ये दबून जखमी झाले.
ओरिसा वरून सुबाभूळचे लाकडे भरून बल्लारशाहकडे जाणारा ट्रक क्रमांक श्प् -४० ण् श् -९३१० शहराच्या मुख्य चौकाच्या ठिकाणी रस्त्याच्या खोदकामामुळे घसरून पल टल्याची घटना आज सकाळी ७:३० च्या सुमारास घडली. या (Dhanora Accidents) अपघातात ट्रक मध्ये असलेले ड्रॉयव्हर व क्लीनर दोघेही आतमध्ये दबून जखमी झाले. मदन भोयर ( ५५) व हरीश बानोस(३०) दोघेही राहणार बल्लारशहा अशी जखमींची नावे आहेत.
लगेच त्यांना (Dhanora Accidents) अपघातस्थळी उपस्थित लोकांनी ट्रकच्या बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. सदर अपघात ग्रस्त ट्रक रस्त्याच्या चिखलात रुतला असून त्यामधील लाकडे रस्ताभर विखुरले आहेत.