कोरची (Tiranga Rally) : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि वीर जवानांच्या त्यागाचा गौरव करणारी ‘मिशन ऑपरेशन सिंदूर तिरंगा यात्रा’ आज कोरची शहरात अतिशय उत्साही वातावरणा भर पावसात संपन्न झाली. या (Tiranga Rally) भव्य रॅलीद्वारे ‘ऑपरेशन सिंदूर’ या ऐतिहासिक लष्करी मोहिमेच्या यशाबद्दल गौरवगान करण्यात आले.
“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी ऐतिहासिक मोहीम यशस्वी होणे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय जवानांच्या पराक्रमाने भारताने जगासमोर नव्या धैर्याचे उदाहरण ठेवले आहे. ही (Tiranga Rally) रॅली केवळ राजकीय नसून, राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा साक्षात उत्सव आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना आमचे शतशः नमन!”
रॅलीला तिरंगा झेंडा (Tiranga Rally) हातात घेऊन सुरुवात झाली. ही रॅली बाजार चौक हनुमान मंदिर, शिवाजी चौक, मेन रोड, बस स्टॉप मार्गे मच्छी मार्केट समारोपापर्यंत उत्साहात पार पडली. रॅलीदरम्यान , “जय हिंद!”, “भारत माता की जय!” अशा घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी कोरचीच्या रस्त्यांवर देशप्रेमाचा जल्लोष व उत्साहाने काढण्यात आली.
या तिरंगा यात्रेत (Tiranga Rally) सहभागी प्रमुख मान्यवर तालुका अध्यक्ष भाजप सदाराम नुरुटी माजी तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी आनंद चौबे नंदकिशोर वैरागडे, अशोक गावतुरे, नगरसेवक मेघश्याम जमकातन घनश्याम अग्रवाल, गोविंद दरवडे, विनोद कोरेटी, नंदलाल पंजवानी,शीलाताई सोनकोतरी ,गीरजा कोरेटी,सगुणा काटेंगे, सुरेश काटेंगे, मधूकर नखाते गुणवंत दरवडे,यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरची व परिसरातील विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभाग घेतला. त्यांनी भारतासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला वंदन केले. ही तिरंगा रॅली देशप्रेमाची भावना प्रेरित होऊन, देशप्रेम जागृत करत आनंददायी व शांतता प्रिय उत्साही वातावरणात रॅलीचा समारोप झाला.
यावेळी पोलीसांच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




 
			 
		

