Chandrapur :- मूल पासून चार की.मी. अंतरावर डोनी फाट्याजवळ ब्रम्हपुरी येथील महसूल अधिकारी व कर्मचारी बोलेरो गाडीने जिल्हाधिकारी यांच्या प्रशिक्षणकरिता जात असताना अचानक भरधाव वेगाने येणार्या ट्रकने शासकीय वाहनाला जोरदार धडक दिल्याने गाडीत असलेले अधिकारी नायब तहसीलदार व सोबत असणारे सहा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी १२.३० च्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती मूल पोलिस (Mul police) यांना कळली. असता जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालय (Hospital)डॉ. बरलावार यांचे उपचारासाठी नेण्यात आले.
अधिकारी नायब तहसीलदार व सोबत असणारे सहा कर्मचारी गंभीर जखमी
या अपघातात (Accident) धडक देणार्या ट्रॅक क्रमांक एम.एच. ३४ बी. झेड.६७९२ हा ट्रॅक अशोक लेलँड कंपनीचा हा भरधाव वेगाने चंद्रपूरकडून मूल कडे येत असताना बोलेरो एम. एच. ३४ सी.डी. ७५६२ या क्रमांकाच्या शासकीय गाडीला जबर धडक दिली. यामध्ये महानंदा मडावी नायब तहसीलदार, विनोद बोडे नायब तहसीलदार, सरिता चन्ने कारकून, प्रिया शेंडे अव्वल कारकून, आशा कोहळे शिपाई व सूरज निहाते खाजगी गाडी चालक हे जखमी झाले. यात ट्रॅक चालकाने हयगय करून ट्रक चालवित असल्याने ट्रॅक चालकावर गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुबोध वंजारी व त्यांची टीम करीत आहे.
ब्रम्हपुरी येथील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अपघाताची माहिती मूल येथील तहसीलदार मृदुला मोरे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली.