७२ उमेदवारानी घेतला उमेदवारी अर्ज मागे
तुमसर(Tumsar):- विदर्भात प्रसिद्ध असलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुका मागील अडीच वर्षापासून रखडल्या होत्या. उच्च न्यायालयाने (high courts) तीन महिन्यात बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून आता सदर निवडणूक १२ मे रोजी होत असुन १३ मे रोजी मतमोजणी होणार असून तुमसर व मोहाडी तालुक्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे .यात तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ७२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याने आता सदर निवडणुकीत एकुन ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.सदर निवडणुकीत तुमसर-मोहाडी तालुक्यात एकुन सात मतदान केंद्र असणार आहेत.त्यात तुमसर तालुक्यात तुमसर, सिहोरा,नाकाडोंगरी, मिटेवानी, हे चार मतदान केंद्र तर मोहाडी तालुक्यात मोहाडी, आंधळगाव, करडी असे तीन मतदान केंद्र (polling station) असणार आहेत.तिन्ही पॅनल मध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने येथे आता वेगळे राजकीय समीकरण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
बाजार समीतीच्या निवडणुकीत शेतकरी , जयकिसान,बळीराजा अशा तिन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पॅनल स्थापीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सेवा सहकारी संस्था गटात
३४ उमेदवार उभे आहेत.
सर्वसाधारण २४
महीला राखीव ०६
ईतर मागासवर्गीय ०४
शेतकरी, जयकिसान, बळीराजा अशा तिन पॅनल उभ्या ठाकल्या
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात ०८, अनुसूचित जाती -जमाती ०५, आर्थिक दुर्बल घटक ०४,अडते व्यापारी ०५,हमाल-मापारी ०२, असे एकुन सदर निवडणुकीत ५८ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.तर ७२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदर बाजार समिती निवडणुकीत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीत, महायुतीत , विकास फाउंडेशन आमने-सामने येणार आहे. यात आमदार राजु कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (nationalist congress party) शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) गटाचे जिल्हा अध्यक्ष कीरण अतकरी, रायदयाल पारधी, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊराव तुमसरे येथे यांचा राजकीय कस लागणार आहे. ३ मे रोजी निवडणुकीत उभे ठाकलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे.
तिन्ही पॅनल मध्ये विविध राजकीय पक्षांची मांदियाळी
तुमसर – मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हे तब्बल अडीच वर्षानंतर होत आहे. सहा महिन्यानंतर विधानसभेची(Assembly) निवडणूक असून दोन्ही तालुक्याच्या राजकारणावर बाजार समितीचे राजकारण अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीची निवडणूक ही थेट शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने तसेच दोन्ही तालुक्यातील विशेषता ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतात. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
निवडणुकीत तिन पॅनल उभ्या ठाकल्या!
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ह्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाही. सहकार क्षेत्रातील ही मोठी निवडणूक मानली जाते. विशेषत: तुमसर व मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भंडारा (Bhandara) जिल्ह्यासह विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गज राजकीय नेते निवडणूक लढवितात. या बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व आले आहे. बाजार समिती निवडणुकीत बळीराजा , जयकिसान, शेतकरी, अशा तिन पॅनल उभ्या ठाकल्या आहेत. बाजार समिती निवडणुकीकरिता एकूण १४२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात १३० वैध तर.१२ अवैध ठरले होते. त्यात ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. तरआता एकुण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.
बाजार समिती ताब्यात घेण्याकरिता राजकीय नेत्याची रस्सीखेच
येथील बाजार समिती करिता एकूण १८ संचालक पदाकरिता निवडणूक होत आहे. ही बाजार समिती ताब्यात घेण्याकरिता महाविकास आघाडी, महायुती, तसेच अन्य आघाडी येथे प्रयत्नशील राहणार महाविकास आघाडी व महायुती, विकास फाउंडेशन,असे तिन पॅनल उभ्या ठाकल्या आहेत.त्यातच आता स्वतंत्र उमेदवार सुध्दा उभे आहेत. तिन पॅनल उभ्या ठाकल्या असल्या तरी एका पॅनल चे नेतृत्व आमदार राजू कारेमोरे ,दुसऱ्या पॅनल चे नेतृत्व माजी आमदार चरण वाघमारे,व तिसऱ्या पॅनलचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊराव तुमसरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कीरण अतकरी,व माजी स़ंचालक रामदयाल पारधी हे नेतृत्व करीत आहेत.
१७ संचालक पदासाठी होणार निवडणूक.!
तुमसर -मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती करिता एकूण १८ संचालक निवडून द्यावे लागतात यात सेवा सहकारी गट ११ ग्रामपंचायत गट ४, अडते व्यापारी गट २ व हमाल मापारी गट १ असे १८ संचालक आहेत.यात आता सेवा सहकारी संस्था गटातील ११ पैकी,भटक्या विमुक्त जाती -जमाती गटातुन गणेशराव बावणे हे एक उमेदवार अविरोध निवडुण आल्याने येथे आता सेवा सहकारी संस्था गटात दहा जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता १७ संचालक पदासाठी थेट निवडणुक पार पडणार आहे.
मतदारांची संख्या
सेवा सहकारी गटात तुमसर तालुक्यात ७६२ तर मोहाडी तालुक्यात ५४४ असे एकुन १३०६, असे एकुन मतदार संख्या आहे. तुमसर -मोहाडी तालुक्यात एकुण १०५ सेवा सहकारी संस्था आहेत. ग्रामपंचायत गटात तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायती असून मतदारांची संख्या ८९७ तर मोहाडी तालुक्यात ७५ ग्रामपंचायती असून त्यात ६७६ मतदार आहेत. यात तुमसर-मोहाडी तालुक्यात १७२ ग्रामपंचायती आहेत. अडते व्यापारी गटात ५०२ तर हमाल मापारी गटात २०१ इतकी मतदारांची संख्या आहे.